अमरावती (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भिलोना गावात धान्य विकण्याच्या शुल्कक कारणावरून झालेल्या भांडणातून मुलांने वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बुधवारी रमेश मालवेंनी सरकारी स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणले होते. आरोपी मुलगा बाळकृष्णने ते धान्य विकले आणि तो दारू पिउन घरी आला. रमेश आणि मुलगा बाळकृष्ण यांच्यामध्ये वाद झाला.याच वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी काठी मारून त्यांचा खून केला. धक्कादायक म्हणजे तो रात्रभर वडिलांच्या मृतदेहाजवळ झोपून राहिला. पोलिसांनी आरोपी बाळकृष्ण मालवेला अटक केली आहे.