नाशिक (वृत्तसंस्था) एका मुस्लिम धर्मगुरुची 4 अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. ख्वाजा सय्यद चिश्ती असे मृताचे नाव आहे. येवल्यात सुफी बाबा म्हणून ते प्रसिद्ध होते.
मंगळवारी सांयकाळी येवला शहरातील चिंचोली एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर धर्मगुरु सुफी बाबा काही कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. हत्येनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी मृताची ओळख पटवली असून मृत मुस्लिम अध्यात्मिक गुरु आहे. तसेच तो मुळचा अफगाणिस्तानचा असल्याचे समोर आले आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ते दिड वर्षांपासून वास्तव्यास होते. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत असून दोघांची चौकशी सुरु असल्याचे कळते.
















