मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यापासून तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
रिया चक्रवर्ती हिला ड्रग रॅकेट प्रकरणात सत्र न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. सत्र न्यायालयाने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासह सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. रियाच्या जामीन अर्जाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने विरोध केला होता. रियाला जामीन मिळाल्यास ती तपासावर परिणाम करू शकते, असा युक्तिवाद एनसीबीने कोर्टापुढे केला. रियाच्या वकिलांनी यानंतर विविध युक्तिवाद सादर केले. परंतु रिया चक्रवर्ती आणि अन्य आरोपींना जामीन का दिला जाऊ नये हे फिर्यादींनी सिद्ध केले. रियाने ड्रग्ज देवाण-घेवाणीत आपला सहभाग असल्याचे मान्य केल्यावर एनसीबीकडून तिला अटक करण्यात आली होती. रिया चक्रवर्ती या प्रकरणात दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.