TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीजचोरांनी कारवाईत अडथळे आणल्यास गुन्हे दाखल करू ; महावितरणचा इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मीटरमध्ये फेरफार किंवा आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणची धडक मोहीम सुरू आहे. या कारवाईत अडथळे आणणाऱ्या तसेच वीजचोरीची बिले न भरणाऱ्या ग्राहकांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. अखंडित वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांनीही सहकार्य करावे तसेच अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्यात सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फीडर निश्चित करण्यात आले आहेत. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते. मुख्यतः वीजचोरीमुळे तूट वाढते. या २३० फीडरमध्ये जळगाव शहरातील विठ्ठलपेठ फीडरचा समावेश आहे. या फीडरवर जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीजवापरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रिडिंग येत आहे का, मीटरमध्ये फेरफार केला आहे का, कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढली व २१ नोव्हेंबरला मोहीम हाती घेऊन कारवाई केली. त्यात ५२ जणांची वीजचोरी पकडण्यात आली तर २१२ आकडे काढण्यात आले.
या ग्राहकांना वीजचोरीची रीतसर बिले देण्यात आली. मात्र अनेक ग्राहकांनी बिले न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी ९ डिसेंबर रोजी महावितरणच्या जोशीपेठ कक्षाचे सहायक अभियंता उमाकांत पाटील व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गेले. मात्र जमावाने त्यांना घेराव घालून कारवाईत अडथळा आणला.
या प्रकरणाची गंभीर दखल महावितरणने घेतली असून वीजचोरीविरोधातील कारवाईत जे कुणी अडथळे आणतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. संबंधितांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करू, सोबतच शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले. तसेच वीजचोरीविरोधातील कारवाई थांबणार नसून, यापुढे अधिक जोमाने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
भारनियमन टाळण्यासाठी वीजगळती रोखणे आवश्यक
जळगाव शहर व जिल्ह्यात वीजगळतीचे प्रमाण अधिक असल्याने गत उन्हाळ्यात आपत्कालीन भारनियमन करण्याची वेळ आली होती. त्यामुळे आणीबाणीचे भारनियमन रोखायचे असल्यास ग्राहकांनी अधिकृत जोडणी घेऊनच वीज वापरावी, असे महावितरणने म्हटले आहे. वीजचोरी रोखल्यास संबंधित फीडरवर भारनियमनाची वेळ येणार नाही. वीजचोरीमुळे ट्रान्सफॉर्मरचा लोड वाढून ते फेल होण्याचे तसेच तारा तुटण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे तेथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. ग्राहकांनी याचा सारासार विचार करून अधिकृत वीज वापरावी आणि नियमित वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ डिसेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात उद्या युवा सेनेतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवा संवादाचे आयोजन

February 25, 2022

प्रथमच किलबिल पालक मेळाव्याचे सुंदर आयोजन बघितले – पियुष साळुंखे

February 27, 2025

राष्ट्रीय किसान मोर्चा धरणगांव तालुकाध्यक्षपदी बाळु चौधरी

September 13, 2020

कमंडलवादास धक्का !

January 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group