जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १९ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अल्अपवयीन संशयित आरोपीने घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन पिडीत मुलीचा हात धरुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन विनयभंग केला. याप्रकरणी भादवि कलम ३५४ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षणसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि दिलीप राठोड हे करीत आहेत.