TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ताई, मी तुला घ्यायला येतोय…भाऊबीजेसाठी बहिणीच्या घरी जाणाऱ्या भावासोबत घडलं भयंकर !

नियतीने बहिण भावाची भेट होऊच दिली नाही ; अज्ञात वाहनाने दोघांना चिरडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) भाऊबीजेसाठी बहिणीच्या घरी येणाऱ्या भावावर काळाने घाला घातला. कांचनवाडी जवळ दुचाकीला एका अज्ञात वाहनाने चिरडल्याने या दुर्दैवी अपघातात दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडला. सुरेश परदेशी (वय ७५) व केशव विठ्ठल भिसे (२३ रा. बालम टाकळी ता. शेवगाव जि. अहमदनगर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

मोटारसायकल स्लिप झाली अन दोघेही पाठीमागून येणाऱ्या वाहनाने चिरडले !

READ ALSO

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

मयत दोघे शेवगाव-पैठण मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. भाऊबीजेच्या सणासाठी शहरात येत असताना कांचनवाडीतील बेंच मार्कसमोर त्यांचा अपघात झाला. समोर जाणाऱ्या मोठ्या वाहनाला ओव्हरटेक करताना अचानक समोरून दुसरी दुचाकी आली. अचानक आलेल्या या दुचाकीने त्यांची मोटारसायकल स्लिप झाली अन दोघेही पाठीमागून येणाऱ्या वाहनाखाली आले. चाकाखाली आल्याने सुरेश परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी केशव भिसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करीत मयत आणि जखमींना घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचा पुढील तपास सातारा पोलिसांनी सुरू केला आहे.

बहिणीची भेट झालीच नाही !
केशव भिसे व सुरेश परदेशी हे दोघेही बालम टाकळीचे. सुरेश यांनाही नातेवाईकांकडे छत्रपती संभाजीनगरला जायचे होते. तर केशव भाऊबीजेसाठी बहिणीला घ्यायला जाणार होता. तु चाललाच आहेस तर मलाही सोबत येऊ दे असे सुरेश यांनी केशवला म्हटले. त्यानुसार गुरुवारी दुपारीच दोघेही दुचाकीने बालम टाकळीहून निघाले. केशव याने बहिणीला ताई…मी तुला घ्यायला येतो, असे सांगितले होते. मात्र नियतीने बहिण भावाची भेट होऊच दिली नाही.

मुलीसोबत शेवटचा तो संवाद ठरला अखेरचा !

परदेशी यांच्या सहा मुलींनी शुक्रवारी भाऊबीजेच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. परदेशी यांच्या दोन मुली शहरात, दोन अहमदनगर, एक नाशिक, तर एक श्रीरामपूरला राहते. सर्व मुली, जावई, नातवंडे शुक्रवारी एकत्र येणार होते. त्यासाठी परदेशी गावाकडून निघाल्यानंतर शहरातील मुली त्यांच्यासोबत सातत्याने संपर्कात होत्या. बिडकीनला असताना मुलीने कॉल करून पैठण रस्त्यावर घेण्यास येत असल्याचे सांगितले. परंतु, तो संवाद दोघांमधला शेवटचा ठरला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
Next Post

आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नाने मिळाले वयोवृद्ध महिलेला जीवनदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची होणार कडक अंमलबजावणी !

December 8, 2023

जामनेरात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींना पाईपाचे फटके, दंडात्मक कारवाई मोहीम जोरात

February 24, 2021

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ३३८ कोरोनाबाधित !

January 27, 2022

दिल्ली कोर्टात भरदिवसा फायरिंग, वकिलाच्या वेशात आले गँगस्टर ; कुख्यात गुंड गोगी ठार

September 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group