TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच : महावितरणचे स्पष्टीकरण

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे हे बिल नियमानुसार असून जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर वीजग्राहकांना दरवर्षी मिळणारी व्याजाची रक्कम वीजबिलामध्ये समायोजित केली जाते, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, आयोगाकडून करण्यात आलेल्या बहुवार्षिक वीजदराच्या निश्चितीकरणानुसार १ एप्रिल २०२२ पासून नवीन वीजदर लागू करण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश वर्गवारीचे दर सन २०२१-२२ मध्ये लागू असलेल्या वीजदराच्या पातळीवरच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सरसकट वीज दरवाढ झाल्याचा आरोप देखील चुकीचा असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

याबाबत माहिती अशी की, महावितरणकडून बहुवर्षीय वीजदर विनिमय २०१९ नुसार वीजदर ठरवून मिळावेत यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासंबंधी आयोगाने ३० मार्च २०२० रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ ते आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंतच्या ५ वर्षांच्या कालावधीसाठी बहुवर्षीय वीजदराचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार महावितरणच्या विविध ग्राहक वर्गवारीसाठी १ एप्रिल २०२० पासून लागू असणारे वीजदर निश्चित केले आहेत.

सध्या १ एप्रिल २०२२ पासून लागू असलेल्या वीजदरानुसार महावितरणकडून वीजबिलांची आकारणी करण्यात येत आहे. यातील बहुतांश वर्गवारीतील वीजदर मागील वर्षीच्या दराच्या पातळीवर ठेवण्यात आल्याने वीजग्राहकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. यासोबतच सद्यस्थितीत वीज ग्राहकांना नियमित वीजबिलांसह अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. सुरक्षा ठेवीचे बिल हे नियमानुसारच आहे. विद्युत नियामक आयोगाने विद्युत पुरवठा संहिता, वितरण परवानाधारकांच्या कृतीचे मानके व पॉवर क्वॉलिटी विनिमय २०२१ च्या मसुद्यावर हितसंबंधितांकडून तसेच परवानाधारकांकडून सूचना, हरकती, अभिप्राय मागविले होते व ते विचारात घेऊन २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सदर विनिमय जारी केले आहे. त्यातील विनिमय क्र.१३ नुसार ग्राहकांची सुरक्षा ठेव सरासरी देयकाच्या दुप्पट तसेच त्रैमासिक बिलिंग असलेल्या ग्राहकांची सुरक्षा ठेव दीडपट करण्याची करण्याची तरतूद विद्युत नियामक आयोगाकडून करण्यात आली आहे.

या तरतुदीनुसार महावितरणकडून वीजग्राहकांना संबंधित आवश्यक सुरक्षा ठेवीमधील रकमेच्या फरकाचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. तसेच जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर दरवर्षी स्वतंत्र परिपत्रक काढून व्याज देण्यात येत असते. त्यामुळे सुरक्षा ठेवीची बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

बापरे ! शौचालय योजनेत दीड कोटींचा भ्रष्टाचार ; रावेर पोलिसात दोन समन्वयकांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य 28 जानेवारी 2025 !

January 28, 2025

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

March 5, 2026

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 20, 2024

इंदू मिलवरुन राजकारण करू नये, सर्वांच्या सहभागाने कार्यक्रम होणार : उद्धव ठाकरेंचे आवाहन

September 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group