जळगाव प्रतिनिधी । संगीत क्षेत्रातील पदमविभूषण संगीत मार्तड पं. जसराज यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतक्षेत्रात पोकळी निर्माण झाली. त्यांच्या देहावसाने आपल्या सार्यांनाच दुःख झालंय. त्यांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी अनुभूती निवासी शाळेतर्फे श्रद्धांजली शास्त्रीय संगीताची मैफल आयोजित करण्यात आली होती.
यात अनुभूतीचे संगीत शिक्षक निखिल क्षिरसागर यांनी रागदारी गायन, राग बागेश्री, राग भिन्न षड्ज मधील पं. जसराज यांची अजहून आये सुंदर प्रिय शाम ही बंदीश, मालकंस रागातील बंदीश तसेच आरंभी वंदिन अयोध्येचा राजा, कासयाची चाड मज नाही या अभंगाचे सादरीकरण करण्यात आले. जसराज यांना सूर व तालातून श्रद्धांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम ऑनलाईन असल्याने अनेक रसिक व संगीत क्षेत्रातील जाणकारांनी आपली उपस्थिती दिली होती. या प्रसंगी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. याप्रसंगी तबल्यावर साथसंगत अनुभूतीचे तबला शिक्षक भूषण गुरव यांनी केली तर हार्मोनियमवर गणेश देसले, तानपु-यावर अंकिता सुराणा, वंशिता भाटीया यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे संचलन अबिदी हुसेन यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालिक निशा जैन व प्राचार्य जे.पी.राव यांनी मार्गदर्शन केले तर यशस्वतेसाठी विक्रांत जाधव, सोनिया मनचंदा, शशिकांत महानोर यांनी प्रयत्न केले.