मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता अर्जुन कपूरला करोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित खुद्द अर्जुनने याबद्दलची माहिती दिलीय.
अभिनेता अर्जुन कपूरला करोनाची लागण झाली आहे. परंतू त्याला कोणतीच लक्षणे नसून सध्या अर्जुनला घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. मला करोनाची लागण झाली असून ही माहिती तुम्हा सर्वांना देणे हे माझं कर्तव्य आहे. मला कोणतीच लक्षणे नसून मी ठीक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी घरीच स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले असून पुढील काही दिवस क्वारंटाइनमध्येच राहीन. माझ्या तब्येतीविषयीचे अपडेट्स मी तुम्हाला सोशल मीडियाद्वारे देत राहीन. या महामारीच्या काळात आपण सर्वजण मिळून या करोना विषाणूशी यशस्वी लढा देऊ अशी मला आशा असल्याचे अर्जुनने म्हटले आहे. दरम्यान, आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग तो अभिनेत्री नीना गुप्ता व रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत फिल्म सिटीमध्ये करत होता. अर्जुनला करोनाची लागण होताच या चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आली आहे.