जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र हे पाकव्याप्त काश्मिर वाटते अशी उपमा देणार्या अभिनेत्री कंगणा रानावत व तिचे समर्थन करणार्या भाजप आमदार राम कदम यांचा कॉंग्रेसतर्फे नुकताच निषेध करण्यात आला.
कॉंग्रेस भवन येथे तालुका अध्यक्ष मनोज चौधरी यांच्या नेतृत्वाखााली जळगाव ग्रामीण तालुका कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकार्यांनी निषेध नोंदवला. यावेळी कॉंग्रेस पदाधिकार्यांनी कंगणा राणावत मुर्दाबाद, राम कदम मुर्दाबाद, महाराष्ट्राची बदनामी करणार्या कंगणा रानावतचा जाहीर निषेध,अशा घोषणा देण्यात आल्यात. तसेच महाराष्ट ही थोर महात्म्यांची पवित्र भूमी आहे, त्याबद्दल अपमानकारक शब्द आम्ही कॉंग्रेसवासी खपवून घेणार नाही. अशा वायफळ वक्तव्य करणार्या कंगणा रानावतला फुले,शाहु, आंबेडकर आणि शिवरायांच्या या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कोणताही हक्क नाही, त्यंाना जिथे सुरक्षित वाटत असेल तिथे त्यांनी खुशाल जावे. यावेळी तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, भाऊसाहेब सोनवणे, भिकन सोनवणे, धनराज जाधव, समाधान पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.