जळगाव (प्रतिनिधी) कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी जळगावात क्लिनिकल ट्रायलला ‘आयुष’ची मान्यता मिळाली आहे. जळगाव शहर व परिसरातील सर्व काेविड रुग्णालयातील ५०० रुग्णांवर ही ट्रायल घेण्यात येणार असून या संशाेधनाला येत्या १५ दिवसांत सुरुवात हाेणार अाहे.
जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून सतत वाढतच आहे. त्यामुळे रुग्णांवर आधुनिक औषधांसह एकात्मिक उपचार म्हणून आयुर्वेदिक उपचार पद्धतीच्या कार्यक्षमतेेने क्लिनिकल ट्रायल (मूल्यांकन) करण्याबाबतच्या प्रस्तावाला आयुष मंत्रालयाने मान्यता दिली आहे. अशा यात जळगाव शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयासह महाराष्ट्रातील तीन संशाेधनाचा समावेश आहे. आयुर्वेद काॅलेजचे अधिष्ठाता, वैद्य मिलिंद निकुंभ हे ह्या संशोधन प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक असून, वैद्य संदीप बिनोरकर हे सहकारी अन्वेषक आहे. वैद्य लीना बडगुजर, वैद्य सुभाष वडोदकर व वैद्य नरेंद्र गुजराथी यांचादेखील या संशोधन प्रकल्पात सहभाग राहील.