धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत नुकताच शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शिक्षणक्रांतीचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, आद्य शिक्षिका व आद्य मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अनुक्रमे शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे , शाखा व्यवस्थापक जगन गावित व जेष्ठ शिक्षक संतोष सूर्यवंशी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्वच बंद आहे अगदी शाळा व महाविद्यालये सुद्धा याला अपवाद नाहीत. असं असतांना विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही म्हणून शाळेच्या सर्व शिक्षक वर्गाने “शिक्षकदिन’ साजरा केला. ज्या बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचविण्याचे काम ज्यांनी केले असे शिक्षण क्रांतीचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले. समाजातील प्रस्थापितांच्या विरोधाला न जुमानता ज्यांनी स्त्री – शूद्रांच्या साठी कार्य केलं अशा आद्य शिक्षिका व मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या त्यागामुळे आज शिक्षण सर्वांसाठी खुले झाले. ज्यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो असे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन या सर्व महापुरुषांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचा देखील सत्कार करण्यात आला. लॉकडाऊन मध्ये देखील शिक्षकांच्या बद्दल असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी काही विद्यार्थांनी त्यांचे मनोगत ध्वनिचित्रफीतींच्या माध्यमातून पाठवले होते ते ऐकविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे , शाखा व्यवस्थापक जगन गावित यांचे मार्गदर्शन लाभले तसेच जेष्ठ शिक्षक संतोष सूर्यवंशी , रिबेका फिलिप , भारती तिवारी , अनुराधा भावे , ग्रीष्मा पाटील , रमिला गावित , स्वाती भावे , पूनम बाचपाई , पूनम कासार , शिरीन खाटीक , दामिनी पगारिया , गायत्री सोनवणे , सपना पाटील , नाजनिन शेख , पुष्पलता भदाणे , लक्ष्मण पाटील , अमोल श्रीमावळे , सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच इंद्रसिंग पावरा , अमोल देशमुख , सरला पाटील , शितल सोनवणे या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नाजनिन शेख यांनी केले.