नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८६,०५२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ११४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८,१८,५७१ वर जाऊन पोहोचला आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८,१८,५७१ इतका झाला आहे. यापैकी ९,७०,११६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशातील ४७,५६, १६५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात ९२,२९० लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी राज्यात कोरोनाच्या १९,१६४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १२,८२,९६३ वर पोहोचली आहे.