नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या संसर्ग झालेल्या ९० हजार १२३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर या दिवसभरात तब्बल १२९० जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमधून चिंताजनक माहिती समोर आली आहे. आजच्या घडीला देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच कोरोनामुळे देशात आतापर्यंत तब्बल ८२ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ९० हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० लाख २० हजार ३६० एवढी झाली आहे. तर १२९० जणांच्या मृत्यूंमुळे कोरोनाबळींचा आकडा ८२ ह्जार ६६ वर पोहोचला आहे. देशासाठी दिलासादायक बाब म्हणजे ५० लाख कोरोनाबाधितांपैकी ३९ लाख ४२ हजार ३६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशामध्ये कोरोनाचे ९ लाख ९५ हजार ९३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांवर आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोनाचे २० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत.