चोपडा (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय बालिकेसोबत अश्लील कृत्य करत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना शनिवारी दुपारी अडीच वाजता घडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात संशयित ज्ञानेश्वर रायसिंग पंडित (कोळी) याच्याविरोधात पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
चोपडा तालुक्यातील एका गावात आठ वर्षीय पीडीत कुटूंबासह वास्तव्यास आहे. शनिवार, 26 ऑगस्ट रोजी दुपारी एक ते तीन महिन्याच्या सुमारास पीडीता घरी असताना संशयित आरोपी ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग याने पीडित मुलीला घरी बोलून तिच्याशी अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग करीत अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांसह तिने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग (चोपडा तालुका) याच्याविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.