धरणगाव प्रतिनिधी । शहरातील बलचपुरा भागात पेव्हर ब्लॉक बसविण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील यांच्याहस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, जितेंद्र धनगर, अजय चव्हाण, नंदकिशोर पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, वाल्मिक पाटिल, सिद्धार्थ चौधरी, अरविंद चौधरी, परेश चौधरी यांच्यासह शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.