TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फर्दापूर ‘रेस्ट हाऊस’ कांड : ‘मदिरा आणि मीनाक्षी’ !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2022
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे व भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यात दोन दिवसापासून ‘व्हायरल क्लिप’वरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अगदी ‘फर्दापूर रेस्ट हाऊस’ वरील महाजन यांचे किस्से जगजाहीर असल्याचे वक्तव्यही खडसेंनी केले. त्यानंतर फर्दापूर ‘रेस्ट हाऊस’मध्ये नेमकं काय झाले होते?, याच्या चर्चेला राज्यभर जोरदार उधान आले. त्यामुळे यानिमित्ताने नव्वदच्या दशकात ‘मदिरा आणि मीनाक्षी’ या नावाने माध्यमांमध्ये प्रचंड गाजलेल्या ‘फर्दापूर रेस्ट’ हाऊस प्रकरण नेमकं काय होतं?, हे जाणून घेऊया !

 

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

‘सेक्स स्कॅन्डल’ असो की, ‘फर्दापूर रेस्ट हाऊस कांड’ जळगाव जिल्ह्याला अशा कामवासकांडांच्या घटनांचा इतिहास तसा जुनाच आहे. राजकीय मंडळींचा ‘ललना’ प्रेमाचा इतिहास ‘सेक्स स्कॅन्डल’पासून सुरु होतो. त्यावेळीही काही राजकीय मंडळी या प्रकरणामध्ये जेलची वारी करून आले होते. परंतू सोशल मिडिया आणि माध्यमांची ‘ब्रेकिंग न्यूज’ची स्पर्धा नसतांनासुद्धा नव्वदच्या दशकात ‘फर्दापूर रेस्ट’ हाऊस कांड ‘मदिरा आणि मीनाक्षी’ नावाने माध्यमांमध्ये प्रचंड गाजले होते. ‘एका तरुणीसोबत लोकप्रतिनिधीचे अश्लील चाळे’ या आशयावर साधारण महिना ते दीड महिना विविध दैनिकांमध्ये वृत्त मालिका प्रकाशित झाली होती. जामनेरच्या एका बड्या नेत्याचे नाव रेस्ट हाऊस कांडसोबत जोडले गेले होते. अर्थात कुणाचेही उघड नाव समोर आले नव्हते. मात्र, त्यावेळी मोठ्या प्रमाणात काही दिवस राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते.

 

पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी म्हणून निवडणून आलेल्या राजकीय व्यक्तीचे एका शासकीय विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत सुत जुळले होते. प्रेम प्रकरण बहरल्यानंतर ते दोघं नेहमी फर्दापूर येथील एमटीडीसीच्या रेस्ट हाऊसवर वेळ मिळेल तसे भेटत होते. एकेदिवशी सायंकाळी नेहमीप्रमाणे प्रेम मिलाप झाल्यानंतर दोघं जण घरी जायला निघाले. परंतू रेस्ट हाऊसवरील शिपायाने कुठल्यातरी कारणावरून लोकप्रतिनिधीसोबत जोरदार वाद घातला.

 

आपल्या तंत्रित असलेल्या शिपायाने जोरजोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली. अगदी पोलिसांपर्यंत गंमत पोहोचली. भेदरलेल्या लोकप्रतिनिधीने संबंधित मतदार संघातील आपल्या सहकारी आमदार मित्राकडे मदत मागितली. त्यामुळे ही रासलीला ऑन रेकॉर्ड येता येता राहिली. कमी पैसे देण्यावरून शिपायाने वाद घातल्याची त्यावेळी चर्चा होती. परंतू ‘प्यार छुपे ना खुशबू’….या प्रमाणे अखेर या रासलीलेची दुर्गंधी पत्रकारांना लागलीच. त्यानंतर नव्यानेच जिल्ह्यात दाखल झालेल्या एका वर्तमान पत्राने याबाबत सर्वात आक्रमक वृत्त मालिका चालवायला सुरुवात केली.

 

फर्दापूर रेस्ट हाऊस कांड जिल्ह्यात लोकं दररोज आता ‘मदिरा आणि मीनाक्षी’ या नावाच्या वृत्त मालिकेच्या स्वरुपात वाचत होते. बातमीत थेट कुणाचेही नाव नव्हते. परंतू वाचकांना बातमी नेमकी कुणाची आहे, हे स्पष्ट कळायला लागले होते. लोकप्रतिनिधी सापडलेल्या महिलेच्या एका मैत्रिणीने यातील अनेक गोपनीय गोष्टी थेट माध्यमांपर्यंत पोहोचवल्या होत्या. त्यामुळे दररोज वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत होती. परंतू या वृत्त मालिकेला जामनेर येथील तालुका प्रतिनिधी माहिती देत असल्याच्या संशयावरून साधारण दोन वेळेस त्या पत्रकाराच्या घरावर अज्ञात लोकांनी दगडफेक केली होती.

 

आता हळू-हळू या प्रकरणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु झाली होती. अगदी विधानसभेतही याबाबत वादळ उठले होते. त्यावेळी खडसे यांनी मदत केल्यामुळे प्रकरण जास्त जोर धरू शकले नव्हते,अशी देखील त्याकाळात जोरदार चर्चा होती. अनेक दैनिकांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतरही कालांतराने हे स्कॅन्डल मागे पडले. नंतर आरोप फेटाळले गेले आणि कालांतराने हा विषयच पडद्या आड गेला. आज अनेकांना असं काही आणि जिल्ह्यातील अमुक नेत्याबरोबर घडले होते, याबाबत माहिती देखील नाही. परंतू जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय नेत्याचे ललना प्रेम समोर आल्यावर फर्दापूर रेस्ट हाऊस कांड अर्थात ‘मदिरा आणि मीनाक्षी’ प्रकरणाचा उल्लेख होतो म्हणजे होतो !

 

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

महावितरणच्या अभियंत्यांने केले प्लाझ्मादान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगर : सॉफ्टवेअर इंजिनियरची ऑनलाईन फसवणूक ; महिलेने २५ हजार रुपयांचा घातला गंडा !

May 31, 2022

ईडीकडून अनिल देशमुख यांना ‘लूकआऊट’ नोटीस

September 5, 2021

बुद्धाने मानवतावादी समाजव्यवस्था निर्माण केली : जयसिंग वाघ

October 15, 2022

NUDE VIDEO CALL व्हायरल करण्याची धमकी देत भुसावळच्या तरुणाकडून उकळली दीड लाखांची खंडणी !

November 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group