अमळनेर (प्रतिनिधी) नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून बोरी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
बोरी मध्यम प्रकल्प,बोरी धरणाची पाणी पातळी २६७.१५मी. सकाळी ०५.०० वाजता धरणाचे १३ दरवाजे ०.१५ मी ने उघडून ५८६३ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सुरु आहे तरी काठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केले आहे.