नांदेड (वृत्तसंस्था) नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यातच त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती.
माझी प्रकृती उत्तम असल्याचा माहिती प्रताप पाटील चिखलीकरांनी दिली आहे. ते सध्या दिल्लीतील निवासस्थानी वास्तव्यास आहेत. दरम्यान, चिखलीकर यांना ७ ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यापूर्वी त्यांच्या मुलाची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सात जणांची चाचणीही कोरोना पॉझिटिव्ह आली होती. चिखलीकरांवर उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले होते. मात्र पुन्हा महिन्याभरात त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.