जळगाव प्रतिनिधी । विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे बुधवार, ९ सप्टेंबर रोजी जिल्हा दौर्यावर येत आहे. यावेळी ते जिल्ह्यातील कोरोना उपाययोजना, कर्जमाफी, पीक कर्ज वितरण, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या सर्व स्थितींचा आढावा घेणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या दुपारी १२ वाजता बैठक हेाणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त गमे यांनी मागील आठवड्यात पदभार स्विकारला असून ते उद्या जळगाव जिल्हा दौर्यावर येत आहे. ९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थीतीत बैठक होईल. यात कोरोना उपाययोजना व जिल्ह्यातील परिस्थीतीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबधित अधिकार्यांची आढावा बैठक घेतली.
आयुक्तांसमोर डिजीटल प्रेझेंटेशन कसे करावे, कोणते मुद्दे मांडायचे, याची रंगीत तालिम घेण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.एन.सी.चव्हाण, अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, लीड बँकेचे महाव्यवस्थापक अरुण प्रकाश आदि उपस्थीत होते.