धरणगाव (प्रतिनिधी) येथील चिंतामणी मोरया परिसरातून एका घराच्या अंगणातून मोटार सायकल चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सुशील राजेंद्र साळुंखे (वय २५, रा. चिंतामण मोरया नगर धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ९ एप्रिल २०२२ रोजी राहत्या घरातील अंगनातून अज्ञात चोरटयाने २५ हजार रुपये किंमतीची मो सा क्र MH१९BD ७२९० चोरून नेली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना राजु पाटील हे करीत आहेत.