जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ७ तालुके निरंक आहेत. तर आज अवघे ३० नवीन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले असून जिल्ह्यातून आज ६३ रूग्ण कोरोनामुक्त झालेत. सुदैवाने आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ०८, जळगाव ग्रामीण- ००, भुसावळ- ०२, अमळनेर-०२, चोपडा-०३, पाचोरा-००, भडगाव-०१, धरणगाव-०१, यावल-०२, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-०१, पारोळा-०२, चाळीसगाव-०८, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-००असे एकुण ३० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५३ हजार ३५९ पर्यंत पोहचली असून ५१ हजार ४३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर सुदैवाने आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर आतापर्यंत १२६९ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. तर ६६० रुग्ण सध्या उपचार घेताय.