जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातून आज १३४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर अवघे ५३ नवीन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर आज चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १६, जळगाव ग्रामीण- ०२, भुसावळ-०४, अमळनेर-०८, चोपडा-०२, पाचोरा-००, भडगाव-०४, धरणगाव-००, यावल-०४, एरंडोल-०१, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-०४, चाळीसगाव-०४, मुक्ताईनगर-०२, बोदवड-०२, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ५३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या एकुण ५३ हजार १४९ पर्यंत पोहचली असून ५० हजार ९९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर ८९३ रुग्ण सध्या उपचार घेताय.