औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच नंदकुमार घोडेले हे अनेक उपाययोजना करत होते. तशातच त्यांना संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. नंदकुमार घोडेले यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध बैठकांनाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करावी, असे आवाहन केले आहे.