जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस डॉ. प्रविण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे.
डॉ.उगले यांनी सुरवातीला जिल्ह्यातील भौगोलिक आणि गुन्हेगारीविषयीची माहिती डॉ. मुंढे यांना दिली. त्यांना कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन उगले यांनी पदभार सोपविला. जिल्हा अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी नवनियुक्त पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांना पदाभार सोपविला. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन,अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस निरीक्षक बापू रोहम, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्यासह पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.