जळगाव (प्रतिनिधी) एटीएम कार्ड क्लोन करून चारशे कोटी रूपये काढण्याची तयारी असणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी रामानंद पोलिसांनी जळगावातून दोन जणांना अटक केली असून उर्वरित ७ आरोपींचा शोध सुरु आहे.
एकनाथराव खडसे यांच्यावर गंभीर आरोप करून चर्चेत आलेला मनीष भंगाळे याच्या मदतीने जळगावच्या दोन तरुणांनी त्याच्याकडून एटीएम कार्ड क्लोनींग करत एक हजार रूपये बँक खात्यातून काढले. त्यानंतर या टोळीचे स्वप्न मोठे झाले व त्यांनी एटीएम कार्ड क्लोन करून चक्क चारशे कोटी रूपये काढण्याचा प्लान आखला. परंतू मनीष भंगाळे याने पोलिसांशी संपर्क साधून सर्व हकीगत सांगितली. त्यामुळे पोलिसांनी त्याला माफीचा साक्षीदार माफीचा साक्षीदार बनवित सापळा रचून जळगावातून दोघांना अटक केली आहे.