जळगाव (प्रतिनिधी ) कुरकुर नाल्या – (नदीवर) पुलाचे बांधकाम करण्याचे दिलेले आश्वासन पुर्ण झाल्याने आनंद होत असून यामुळे कुरकुर नाल्यावरील पुलामुळे दळणवळण सुलभ होईल. परिणामी दापोरा परिसराच्या विकासाला या गती मिळेल. शेती टिकविण्यात झालेल्या पूलांचे व रस्त्यांचे मोलाचे योगदान ठरेल याची खात्री असून कुरकुर नाल्यावरील पूल शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की. राजकारणात यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी चांगले काम करून सतत संपर्क ठेवला पाहोजे व शांत स्वभाव ठेयून समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे काम करावे. तुटलेली मने जोडण्यास प्राधान्य द्यावे.विटनेर येथे 4 एकर जागेत सौर उर्जा प्रकल्पाचे सर्व्हेक्षण सुरु असून लवकरच प्रकल्प उभारला जाणार असून म्हसावद येथे संस्थेमार्फत 10 लाखाच्च्या रुग्णवाहिकेचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दापोरा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन !
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांचे शुभहस्ते विधिवत पूजा करून मोठ्या उत्साहात दापोरा ते लमांजन रस्त्यावरील कुरकुर नाल्यावरील पुलाचे लोकार्पण (८ कोटी) , दापोरा येथे नदी लगत संरक्षण भिंत बांधणे (१५ लक्ष), जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन (लक्ष ७० हजार), नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, (२२ लक्ष), मूलभूत सुविधा – २५१५ विकास योजनेतर्गत वार्ड क्रमांक १ मध्ये पेव्हींग ब्लॉक व कॉंक्रिटीकरण करणे (५ लक्ष ), शिरसोली ते दापोरा रस्ता (बोगद्या खालून) रस्त्याचे डांबरीकरण करणे (४९ लक्ष), दापोरा ते शिरसोली रस्त्यावर येंगी नाल्यावर पूल बांधणे (८५ लक्ष), एकूण १० कोटी ५३ लक्षच्या कामांचे भूमिपूजन वाजत – गाजत व मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रेणी १ चे उपअभियंता सुभाष राऊत यांची कार्यकारी अभियंता म्हणून प्रमोशन झाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यांची उपस्थिती
कार्यक्रमाला याप्रसंगी जि.प.चे माजी सभापती प्रभाकरआप्पा सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नानाभाऊ सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी , युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे रमेशआप्पा पाटील, सा. बा. चे उप अभियंता सुभाष राऊत, पंकज पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, डॉ. कमलाकर पाटील, ह. भ. प. ज्ञानेश्वर पाटील – जळकेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, माजी उपसभापती डॉ. कमलाकर पाटील, समाधान चिंचोरे, पी. के. पाटील, संचालक अनिल भोळे, दक्षताचे अर्जुन पाटील, विभाग प्रमुख देविदास कोळी, सुनिल बडगुजर , कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष, मुकेश सोनवणे, नारायण सोनवणे, शिवाजी कोळी, कॉन्ट्रॅक्टर अभिषेक कौल, अनिल सोनवणे, विरेंद्र पाटील, रवि कापडने, दिपक राठोड, यांच्यासह वि.का. सोसायटी चेअरमन प्रकाश काळे, लमांजनचे गोरख पाटील, भागवत पाटील, विजय आमले, नारायण चव्हाण, हंसलाल परदेशी, सुरेश गोलांडे, शिरीष पाटील सर, महेंद्र सोनवणे, विनोद बारी, मिश्रिलाल राठोड, तालुक्यातील अनेक सरपंच, वि. का. सोसायटीचे पदाधिकारी, बाळासाहेबाच्या शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाचे प्रास्तविक आयोजक तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र उर्फ नाना सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन जि.प.चे दापोरे येथील उपशिक्षक रविंद्र पाटील यांनी केले. आभार गोरख पाटील यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम सोनवणे, दिपक राठोड, राजेश राठोड, निलेश सोनवणे, गोरख पाटील, महेंद्र सोनवणे, पुरुषोत्तम काळे, समाधान कोळी, भूषण वाघ, कैलास सपकाळे, देवा कोळी, प्रवीण पाटील, नितिन सपकाळे, अनिल सपकाळे, मिलिंद चव्हाण, महेंद्र चव्हाण, गणेश सपकाळे, वाल्मिक पाटील, अशोक कोळी, रविंद्र चव्हाण, मनिष सपकाळे, यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.