जळगाव (विजय पाटील) एकनाथराव खडसे यांना आपण रत्नागिरीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेत येण्याचे जाहीर ऑफर दिली होती, याबाबत काय सांगाल?, असा प्रश्न विचारताच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हात जोडून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री माझ्यापेक्षा चांगल बोलतील, असे म्हणत पत्रकार आवरती घेतली.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. विद्यापीठात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी प्रशासकीय भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ना.सावंत यांना एकनाथराव खडसे यांना आपण रत्नागिरीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेत येण्याचे जाहीर ऑफर दिली होती, याबाबत काय सांगाल?, अस प्रश्न विचारताच त्यांनी हात जोडून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे अधिक चांगले बोलतील. याबाबत आम्हा दोघांचे एकमत आहे, फक्त एवढे बोलू पत्रकार परिषद आटोपती घेतली. यावेळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, सिनेट सदस्य विष्णू भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, रत्नागिरीच्या एका पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही, असे शिवसेना प्रवक्ते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खडसेंना खुली ऑफर दिली होती. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खडसेंचे जाहीर युद्ध सुरु आहे. खडसे जर वेगळा विचार करणार असतील, तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही, असे उदय सामंत यांनी म्हणाले होते.
खडसे यांच्या स्फोटक वक्तव्यानंतर भाजपमध्ये सुरु झालेले युद्ध आता शीत युद्ध राहिलेले नाही, तर हे खुले युद्ध सुरु झाले आहे. भाजपमधील ज्येष्ठ असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर ही वेळ येत असेल तर ते दुदैवी आहे. त्यामुळे खडसेसाहेब भविष्यात काही विचार करणार असतील तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही, असे देखील सामंत म्हणाले होते.
एवढेच नव्हे तर, एकनाथराव खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चाही जोरात सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर सेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी डिसेंबर २०१९ दोन दिवस तातडीने शहराच्या दौºयावर येत सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते.