जळगाव (प्रतिनिधी) दांडिया खेळतांना झालेल्या वादातून शिवीगाळ व मारहाण करत विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एक २२ वर्षीय विवाहिता १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दांडिया खेळत होती. यावेळी रामनगर येथील रहिवासी दया खामकर, बाजीराव खामकर, खंडू देसले, वंदना खामकर, सोनी बाजीराव खामकर, त्रिशा, वैशाली (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी विवाहितेला धक्का लागल्यानंतर सर्वांनी शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल फारूक तडवी हे करीत आहे.