धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील पारोळा रोडवरील कब्रस्तानमधून विविध साहित्याची चोरी झाल्याप्रकरणी माजी नगरसेवक हाजी इब्राहीम शेख यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
माजी नगरसेवक हाजी इब्राहीम शेख यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पारोळा रोडवरील मुस्लीम कब्रस्तानमधून दि.३० सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्याने दुपारी चार वाजेच्या सुमारास वायरचे बंडल,चार एलएडी लाईट, मोठा बोर्ड असा ऐवज चोरून नेला आहे. या चोरी चौकशी करून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील हाजी इब्राहीम शेख यांनी केली आहे.