धरणगाव (प्रतिनिधी) राज्यासह देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र येथील बसस्थानकाचे नूतनीकरन करतांना उरलेली वाळू आणि इतर सेंटीगचा सामान पडून असल्यामुळे बस चालकासह प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी बससेवा बंद होती. काही महिन्यांपूर्वी जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली होती. आता आंतरराज्य बस सेवा देखील सुरु झाली आहे. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. धरणगाव बस स्थानकाच्या वॉल कंपाऊंडचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नूतनीकरणाचे साहित्यासह वाळू आगाराच्या आवारात सर्वत्र पडून असल्याचे चित्र आहे. यामुळे बस चालकासह प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ वाळूचे ढीग आणि सेंटीग साहित्य तातडीने हलवावे, अशी मागणी होत आहे.