धरणगाव (प्रतिनिधी) पुणे-नंदुरबार व खान्देश एक्सप्रेस गाडी नियमित करण्यात यावी, यासाठी धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचा जनरल मॅनेजर यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. नुकतेच याबाबतचे एक निवेदन देण्यात आले आहे.
धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेन्द्र कोठारी एस.डब्लू.पाटील,दिनकर पाटील, आनंद बाजपेयी यांनी मध्य रेल्वेचे चीफ कमर्शियल मॅनेजर मणीजित सिंग,सी.सी.एम. इती पांडे मॅडम,चीफ ऑपरेटिंग मॅनेजर मुकुल जैन, ए.सी.एम.सुदर्शन देशपांडे तसेच पश्चिम रेल्वे चे डि.जी.एम.उज्वल, ए.जी.एम.प्रकाश बुटानी, झेड.आर.यु.सी.सी.कमलेश शाह यांची भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यात पुणे नंदुरबार नवीन गाडी सुरु करावी, त्याचप्रमाणे खान्देश एक्सप्रेसला बांद्राहून सुटण्याची वेळ 2 तास आधी करावी. त्यामुळे अमळनेर-धरणगावच्या अप-डाऊन करण्याऱ्यांची सोय होईल. तसेची ही गाडी डेली करावी. सुरत-अमरावती एक्स. ला स्लीपर कोच लावावे व डेली करावी. सुरु असलेली मुंबई नंदुरबार ट्रेन हिला पाळधीपर्यंत करावी. यावेळी सिनियर सिटिझनची सवलत पूर्ववत करण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाली. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या माध्यमातून मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.