भडगाव (प्रतिनिधी) गिरड गावाजवळील गिरणा नदीला आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले. यातील एकाचा मृतदेह उत्राणजवळ सापडला तर दुसर्याचा शोध सुरू आहे. ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली.
कासोदा येथील अयाजोद्दीन शफिउद्दीन हे जामनेर येथे कामानिमित्त गेले होते. परत येतांना त्यांच्या सोबत एक व्यक्ती होता. गिरडजवळ गिरणा नदी पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. अयाजोद्दीन शफिउद्दीन यांनी मोटार सायकल पाण्यात टाकली. परंतू प्रवाह जोरात असल्याने मोटारसायकलसह दोघे वाहून गेले. बर्याच वेळाने शोध घेतल्यानंतर उत्राण गिरणा नदीपात्रात अयाजोद्दीन यांचा मृतदेह आढळला. तर त्यांच्या सोबतच्या व्यक्तीच्या मृतदेहाचा मात्र अद्यापही पत्ता लागला नाही.