जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर गेटअप बदलवून जळगावात येऊन गेल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, झंवर जळगावला येण्यापूर्वी उज्जैन येथे एका महाराजांकडे दर्शनासाठी गेला असल्याचे देखील कळते.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर गेटअप बदलवून जळगावात येऊन गेल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. झंवर दाढी वाढवून जळगावात दोन दिवस थांबल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर, जळगावला येण्यापूर्वी झंवर उज्जैन येथे एका प्रसिद्ध महाराजांकडे देखील दर्शनासाठी गेला होता. त्यानंतर झंवर गेटअप बदलवून जळगावात दोन दिवस थांबल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात छापेमारी करून दोन ट्रकभरून कागदपत्र जप्त करून नेले होते. या कागदपत्रांमधून मुख्य संशयित सुनील झंवर, अवसायक जितेंद्र कंडारे यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे पोलिसांना मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांचा पुन्हा कसून शोध सुरु केला असल्याचे वृत्त समोर आले होते. उद्या मंगळवार (दि.५ जानेवारी रोजी) न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयितांच्या जामीन अर्जावर पुणे न्यायालयात सुनवाई होणार आहे.