चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वड्री येथे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर येत आहे. ही दुर्घटना नेमकी कशी झाली?, याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाहीय. यात एकाचा मृत्यू झाला असून महिला पायलट गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
तालुक्यातील वर्डी येथे हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत होलिकॉप्टरमधील आणखी कुणी जखमी झाले आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीय. दरम्यान, घटनास्थळावर चोपडा शहर पोलीस पोहचले असल्याची, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. चोपडा तालुक्यातील वड्री शिवारात सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या राम तलाव परिसरात दुर्घटना दुपारी चारच्या सुमारास झाली आहे. दुर्घटना झालेले हेलिकॉप्टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान आहे ही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र हेलिकॉप्टर असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत महिला पायलट गंभीर जखमी आहे. दरम्यान, चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्थळी पोहचत असल्याचे कळते.
दरम्यान, महिला पायलट गंभीर जखमी झाली होती. हेलिकॉप्टरमध्ये ती अडकली होती. ग्रामस्थांनी तिला बाहेर काढले व रुग्णवाहिकेतून चोपड्याला उपचारासाठी हलवले. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण दोनच जण होते. सरावा दरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची प्राथमिक आहे.