जळगाव (प्रतिनिधी) नंदुरबारचे एएसपी चंद्रकांत गवळी यांची जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी याची तर भाग्यश्री नवटके यांची पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे.
नंदुरबारचे एएसपी चंद्रकांत गवळी यांची जळगाव येथे अप्पर अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जळगावच्या अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांची पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली. त्याचप्रमाणे अमळनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारीपदी मुंबईचे राकेश जाधव यांची. तर, भुसावळचे गजानन राठोड यांची मुंबईला बदली झाली. दरम्यान, पोलिस खात्यातील तब्बल १५० वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ४३ आयपीएस अधिकार्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने बुधवारी रात्री आदेश जारी केले आहेत.