मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी ५११ पोलीस करोनाबाधित आढळले असून, सात पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १६ हजार ९१२ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार २० जण, करोनामुक्त झालेले १३ हजार ७१९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १७३ जणांचा समावेश आहे. राज्यातील १६ हजार ९१२ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ८१८ अधिकारी व १५ हजार ९४ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार २० पोलिसांमध्ये ३८२ अधिकारी व २ हजार ६३८ कर्मचारी आहेत. करोनामुक्त झालेल्या १३ हजार ७१९ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ४२१ व १२ हजार २९८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १७३ पोलिसांमध्ये १५ अधिकारी व १५८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.