TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी मंत्र्याच्या ‘पीए’ची अश्लील क्लिप आणि जळगाव जिल्ह्यातील वासनाकांडांचा इतिहास ! (UPDATED)

The Clear News Desk by The Clear News Desk
February 4, 2022
in जळगाव, राजकीय, विशेष लेख, सामाजिक
1
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी एका माजी मंत्र्यांच्या अश्लील व्हिडीओ क्लिपबाबत वक्तव्य करत काही दिवसांपूर्वी खळबळ उडवून दिली होती. तर मागील वर्षी भाजपच्या एका नेत्याचे अश्लील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर राजकारणात भूकंप आला होता. परंतू ‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’ असो की, ‘फर्दापूर रेस्ट हाऊस कांड’ जळगाव जिल्ह्याला अशा कामवासनांच्या घटनांचा इतिहास तसा जुनाच आहे. या लेखातून आपण तो जाणून घेऊ..!

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

 

सलग दोनवेळेस विजय मिळवीत जळगाव लोकसभा मतदार संघावर आपली पकड निर्माण केल्यानंतर सोशल मीडियातील कथित अश्लील फोटोंचे राजकारण करत भाजपातील अंतर्गत विरोधकांनी ए.टी.पाटील यांचा पद्धतशीरपणे राजकीय गेम केला होता. त्यानंतर खासदार ए.टी.नाना पाटील यांनी तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि मंत्री गिरीश महाजन यांनी माझा घात केला, असा आरोप पारोळा येथे झालेल्या सभेत केला होता. तिकीट कापले गेल्यानंतर मात्र, या प्रकरणावर कुणीही भाष्य केले नाही. परंतू निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात सगळीकडे याच विषयाचे चर्वण सुरु होते. दैनिकांसह सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात दररोज बातम्या प्रसारित होत होत्या.

 

ए.टी.पाटील यांचे प्रकरण शांत झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी एका मंत्र्याच्या पीएची महिलेसोबतची अश्‍लील क्लीप माझ्याकडे आहे. तो मंत्री व पीए कशा पद्धतीने काम करतात, याची वरिष्ठांना माहिती दिली असल्याचे सांगून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी  खळबळ उडवून दिली होती. आपल्या वक्तव्यात त्यांनी मंत्र्याचे नाव घेतले नसले तरी, त्याबाबत जामनेरच्या प्रफुल्ल लोढा यांना विचारा म्हणून सूचक इशारा देऊन टाकला होता. खरं म्हणजे जामनेर तालुक्यात याआधी देखील एका लोकप्रतिनिधीचे फर्दापूर रेस्ट हाऊस कांड खूप गाजले होते.

 

‘एका तरुणीसोबत लोकप्रतिनिधीचे अश्लील चाळे’ या आशयावर अनेक दिवस दैनिकांमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. जामनेरच्या एका बड्या नेत्याचे नाव रेस्ट हाऊस कांडसोबत जोडले गेले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात काही दिवस राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. अनेक दैनिकांनी हा मुद्दा लावून धरला होता. परंतू नंतर हा मुद्दा मागे पडला, पुढे आरोप फेटाळले गेले आणि कालांतराने हा विषय पडद्याच्या आडच गेला. आज अनेकांना असं काही आणि जिल्ह्यातील अमुक नेत्याबरोबर घडले होते, याबाबत माहिती देखील नाही.

 

पाचोरा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार दिलीप वाघ यांच्याविरुद्ध औरंगाबाद येथील तरुणीवर सरकारी विश्रामगृहात बलात्कार केल्याप्रकरणी  २५ फेब्रुवारी २०११ रोजी गुन्हा दाखल झाला होता. विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही आमदार वाघ व त्याचा पीए महेश उर्फ बंटी माळी यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी वाद घालून सिंहगड या सरकारी विश्रामगृहाचा ताबा घेत तेथेच पीडित युवतीवर बलात्कार केल्याची तक्रार पिडीत तरुणीने पोलिसांत दिली होती. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. तर जळगावचे तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनीच खोटी तक्रार देण्यास भाग पाडल्याचे दिलीप वाघ यांचे म्हणणे होते. या प्रकरणातही बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते.

 

कधीकाळी १९९३-९४ मधील जळगावातील कथित सेक्स स्कॅँडलच्या कॅसेटने देखील कधी काळी धुमाकूळ घातला होता. विधानसभेत दिलेल्या त्या कॅसेटमध्ये नेमकं कोण होते, हे आजतागायत समजून आलेले नाही. ‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’शी संबंधित वेगवेगळे तब्बल २० गुन्हे दाखल होते. जळगावातील वेगवेगळ्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये तीन खून झाल्याचे देखील एकनाथराव खडसे विधानसभेत सांगितले होते. एवढेच नव्हे तर, सभागृह अध्यक्षांना वासनाकांडची कॅसेट देखील दिली होती. भुसावळमध्ये ड्रग्ज विकले जाते. यावर आपल्या तक्रारीवरून कारवाई झाली आणि त्यातून जळगाव सेक्स स्कॅन्डल उघडकीस आले. त्यामुळे जे मुंबई स्फोटातील आरोपी आहेत,तेच सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी असल्याचा आरोप देखील खडसे यांनी केला होता.

 

‘सेक्स स्कॅन्डल’ तपासाचा वेग जसं-जसा वाढू लागला,तसं साधारण ३२ जणांना अटक झाली. जळगाव व भुसावळ येथील दोन मोठ्या घटना प्राथमिक तपासात समोर आल्या होत्या. त्यात भुसावळची घटना आधी घडलेली होती. तपासात कालांतराने पीडितांची संख्या आणि गुन्ह्यांची व्याप्ती वाढली. या स्कॅन्डलमध्ये तब्बल ३०० ते ५०० पिडीत महिला, मुलींचे शोषण झाल्याची चर्चा त्यावेळी समोर आली होती. जळगाव शहरात वेगवेगळ्या लैंगिक शोषणाच्या घटनांमधून त्याकाळात तीन खून झाले होते. तर आपली तक्रार घेऊन हायकोर्टात गेलेल्या एका महिलेला जिवंत जाळण्यात आले होते.

 

जळगाव सेक्स स्कॅन्डल प्रकरणात जळगावचा एक विद्यमान नगरसेवक, दोन डॉक्टर आणि एका नेत्याच्या मुलाला अटक झाली होती. दुसरीकडे भुसावळ मधून एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या वकीलाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सुरुवातीच्या काळात समोर आलेली सर्वच संशयित ही राजकारणासह शहरातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात प्रत्येक कट्ट्यावर सगळीकडे याची एकच चर्चा सुरु असायची. या सर्व गोष्टी शहरातील एका अपार्टमेंट व तिरुपती नामक हॉटेलमध्ये सुरु होत्या आणि ही हॉटेल आधीच एक टोळी वापरत होती.

 

भुसावळमधील राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष असलेल्या वकीलावर भुसावळ मधीलच डॉक्टरच्या रुग्णालयातील एका नर्सने बलात्काराचा आरोप केला होता. २ जुलैला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळमधील एका वैद्यकीय अधिकारीने २५ जून रोजी पिडीतेच्या वतीने सामुहिक बलात्काराची तक्रार नोंदवली. त्यात एका डॉक्टरसह तीन जण आरोपी होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी याप्रकरणात ४९ पिडीतांची नावे,सामोर आल्याचे सभागृहात सांगितले होते. तसेच आ. एकनाथराव खडसे यांनी सभागृहात दिलेली कॅसेट बघितल्यावर काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, ‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’ प्रकरणातील बहुतांश आरोपी निर्दोष सुटले होते. पण तोपर्यंत या वासनाकांडामुळे अवघ्या जगात जळगावची कधीही पुसून न निघणारी बदनामी झाली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
Next Post

अमृत, मलनिस्सारणची कामे त्वरित पूर्ण करा ; महापौरांनी मक्तेदाराला दिले पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुबेर ग्रुप व पाचपावली कट्टातर्फे सुरेश दाभोडे यांचा सत्कार

June 4, 2021

राज्यात १५ दिवसांची संचारबंदी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया ; म्हणाले…

April 14, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 12 जून 2024 !

June 12, 2024

मुक्ताईनगर मतदारसंघातील ग्रामपंचायतींना15 व्या वित्त आयोगातील निधीचे त्वरित वितरण करा ; रोहिणीताई खडसे यांची मागणी !

July 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group