TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर मतदारसंघातील ग्रामपंचायतींना15 व्या वित्त आयोगातील निधीचे त्वरित वितरण करा ; रोहिणीताई खडसे यांची मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
July 31, 2024
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मतदारसंघातील मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना 2023-24 अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्यात आलेला नाही. अशा निधीपासून वंचित ग्रामपंचायतींना तात्काळ निधी वितरित करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमुद करण्यात आले आहे कि, ग्रामिण विकासाचा मानबिंदू असलेल्या ग्रामपंचायत ना “ग्राम संसद” म्हणून ओळखले जाते. ग्रामिण भागातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शासनातर्फे ग्रामपंचायतीना गावात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये 80 टक्के निधी थेट ग्रामपंचायतीना मिळत असल्याने गावांच्या विकासामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढला आहे. 15 व्या वित्त आयोगाचा निधी हा दोन प्रकारचा असून यात अनटाईड (अबंधित) व टाईड (बंधित) असे दोन प्रकार येतात. यामधील जो अनटाईड निधी आहे तो गावातील विकासकामांच्या गरजेनुसार वापरला जातो व टाईड निधी हा शासनाकडून ठरविण्यात आलेल्या ठरावीक कामांसाठी खर्च करण्याचे शासन निर्देश आहेत.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

यात बंधित (टाईड)निधी अंतर्गत गावातील स्वछता व हगणदारीमुक्ती साठी सार्वजनिक शौचालय बांधणे त्याची दुरुस्ती करणे मुतारी बांधणे, गावातील कचरा संकलन वाहतूक व घनकचरा व्यवस्थापन करणे, पाणीपुरवठा योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा विस्तार करणे आणि पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती करणे, पावसाचे पाणी संकलन व पुनर्भरण व पाण्याचा पुनरवापर करणे साठी कामे करणे,शेतशिवारातील पाणीशिवारात जिरवण्यासाठी माती बांध, शेत तळे,सिमेंट बांध बांधणे यासारख्या कामांचा समावेश आहे.

तर अबंधित (अनटाईड) निधी मधून पेयजल व पाण्याच्या साठवणूकीचे साधन.मुलांचे लसीकरण, मुलांचे कुपोषण रोखणे,ग्रामपंचायती अंतर्गत रस्ते दुरुस्ती व देखभाल,ग्रामपंचायती अंतर्गत पादचारी रस्ते व बांधकाम दुरुस्ती,एलईडी दिवे व सौर प्रकाश दिवे उभारणी व दुरुस्ती व देखभाल, विद्युतीकरणावरील खर्च, स्मशानभूमीचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल आणि स्मशानभूमीसाठी जमीन संपादन, जमीन अधिग्रहण आणि देखभाल आणि मृतदेह दफनभूमीची देखभाल. ग्रामपंचायतींना पुरेसे आणि उच्च बँड विडथ वाय फाय नेटवर्क सेवा प्रदान करणे,सार्वजनिक वाचनालय, ग्रामपंचायतींमध्ये मुलांच्या उद्यानासह मनोरंजन सुविधा, खेळाचे मैदान रुरल हट (ग्रामीण भागात आठवडी बाजार सोय),नैसर्गीक आपत्ती/साथीच्या रोगात तात्काळ मदत कार्य सुविधा उपलब्ध करून देणे, क्रिडा व शारिरीक तंदुरुस्ती साहीत्य, ड्रेनेज व तुंबलेल्या पाण्याचे व्यवस्थापन करणे ,आकस्मीक आपत्ती व्यवस्थापन असे कामे करण्या बाबत शासन निर्देश आहेत.

यातून ग्रामस्थांना स्वच्छता ,आरोग्य,शिक्षण व पायाभुत मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत. परंतू मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात असणाऱ्या मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीना 2023- 24 अंर्तगत 15 व्या वित्त आयोगातील निधीचे वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे या गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी गाव कारभाऱ्यांना अडचणी येत असुन ग्रामस्थ मुलभूत सोयी सुविधां पासून वंचित राहत आहेत. तरी या ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगाचा निधी त्वरित वितरित करण्यात यावा. काही ग्रामपंचायतींना निधी मिळण्यासाठी काही तांत्रिक अडचणी वा त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला मार्गदर्शन करून 15 व्या वित्त आयोगाच्या निधी पासून वंचित या ग्रामपंचायतीना निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
Next Post

पिंप्री खुर्द येथील तरूणाने संपविली जीवनयात्रा ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यार्थिनींना पाय चेपायला लावायची, डबाही फस्त करायची ; वादग्रस्त मुख्याध्यापिका निलंबित !

June 20, 2023

ग्रामपंचायत सदस्याचा धारदार शस्त्राने खून ; धक्कादायक कारण आले समोर !

October 16, 2023

‘मंत्री यशोमती ठाकूर यांनी ८०० कोटींचा घोटाळा केला’ ; खा. नवनीत राणांचा खळबळजनक आरोप

August 13, 2021

… ते हेमंत करकरेंना देशभक्त म्हणत नाहीत ; प्रज्ञा ठाकूरचं वादग्रस्त विधान !

June 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group