रावेर प्रतिनिधी । शासनातर्फे मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मका खरेदी बंद करण्यात आली आहे मात्र रावेरसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अद्याप शासनाकडे नोंदणी केलेल्या शेतकर्यांकडील मक्याची खरेदी न झाल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजीची भावना आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांचा मका खरेदीसाठी शासनाकडे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आठशे शेतकरी वेटींगवर
रावेर तालुक्यातील बाराशे शेतकर्यांनी शासनाला मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती शिवाय एका वेळेला मुदतवाढ मिळाल्यानंतरदेखील तालुक्यातील 386 शेतकर्यांचा चार कोटी 57 लाखांचा 25 हजार 978 क्विंटल मक्याची खरेदी झाली तर सुमारे आठशे शेतकर्यांकडील मक्याची खरेदी अद्यापही बाकी आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत काही दिवसांपूर्वी रावेरात आले असतांना त्यांनी मका खरेदीला मुदतवाढ करण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पुढे म्हणाले की, रावेर तालुक्यासह जिल्हातील इतर तालुक्यांमध्येदेखील शासनाकडून मका खरेदी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने तात्पुरती बंद केले आहे. आम्ही पुन्हा मुदतवाढ मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहेत. शासन मका खरेदी केंद्रासंदर्भात नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल, असा सकारात्मक विश्वास जिल्हाधिकार्यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना व्यक्त केला.