हाथरस (वृत्तसंस्था) काल माझ्या काकांच्या छातीवर लाथ मारली. आम्हाला सगळ्यांना रूममध्ये बंद केले. पोलिसांचा चारही बाजूंनी पहारा आहे. मी शेतातून लपून छपून इथपर्यंत पोहोचलो आहे. डीएम साहेबांनी काल माझ्या काकांच्या छातीवर लाथ मारली, असा आरोप पीडित तरूणीच्या भाऊने केला आहे. तो कसाबसा पोलिसांची नजर चुकवून शेतातील रस्त्यावरून धावत मीडियासमोर पोहोचला होता.
पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी आरोप केला की त्यांना सरकारकडून अडकवण्यात आले आहे आणि कुटुंबातील सदस्ययांचे मोबाईलही हिसकावून घेतले आहेत. इतकंच नव्हे तर संपूर्ण हाथरसमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून पीडित कुटुंबियांच्या गावात जाणारे प्रत्येक रस्ते सील करण्यात आले असून तेथे येण्यास बंदी घातली आहे. पीडित तरूणीचा भाऊ कसाबसा पोलिसांची नजर चुकवून शेतातील रस्त्यावरून धावत मीडियासमोर पोहोला. मृत तरुणीच्या भावाने सांगितले की, आम्हाला घाबरवले गेले होते. आमचा फोनही हिसकावून घेतला ज्यामुळे आम्ही कोणाला बोलावू शकणार नाही. सगळ्यांचे फोन हसिकावले. कोणालाही बाहेर येऊ दिले जात नाही आहे. डीएम साहेबांनी काल माझ्या काकांच्या छातीवर लाथ मारली. म्हणून आमची आई आणि वहिनीने म्हटले होते की मीडियाला बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे. मी शेतातून लपून छपून इथपर्यंत पोहोचलो असल्याचे पिडीतेच्या भावाने सांगितले.