पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फ्राँड कॉलवरुन क्विक सपोट अँप डाऊनलोड करताच जिलानी कमरुद्दीन तडवी (वय ४५, रा. श्रीनगर, पिंपळगाव हरे ता. पाचोरा) यांच्या खात्यातून १ लाख १८ हजार रुपये क्रेडीट कार्डमधून गेले. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात जिलानी कमरुद्दीन तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फ्राँड कॉलवरुन जिलानी तडवी यांनी क्विक सपोट अँप डाऊनलोड केले. त्यानंतर तडवी यांच्या मोबाईलचे स्क्रिन शेअर झाले आणि त्यानंतर १,१८,००० रुपये स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा पाचोराचे क्रेडीट कार्ड अकाऊंटमधुन कपात झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तडवी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेद्र वाघमारे हे करीत आहेत.