TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही ; शिवसेनेचे गुणरत्न सदावर्तेवर टीकास्त्र

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनावरून शिवसेनेनं भाजपवर तोफ डागली आहे. गुणरत्न सदावर्तेंसह गोपीचंद पडळकरांवरही सेनेनं सामना अग्रलेखातून निशाणा साधला. माकडांच्या हातात विरोधी पक्षाने कोलीत देऊ नये. महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही, असा सल्ला भाजपला देत गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

शरद पवारांच्या घरावर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय सलोख्यास, संस्कृतीस काळिमा फासणारे कृत्य आहे. कामगार चळवळही यामुळे बदनाम झाली आहे. एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे ही एक मागणी सोडली तर कामगारांच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या. 92 हजार एस.टी. कामगारांपैकी बहुसंख्य कामावर रुजू झाले, पण कोणीएक गुणरत्न सदावर्तेच्या चिथावणीमुळे कामगारांचा एक गट आझाद मैदानावर लढण्याच्या गर्जना करीत बसला होता. यापैकी एक ‘झुंड’ शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचली व त्यांनी दगड, चपला वगैरे फेकून हल्ला केला. सदावर्ते हा माणूस अचानक उपटला व त्याला प्रसिद्धीमाध्यमांतून अकारण मोठेपण दिले गेले. सदावर्तेचा भस्मासुर निर्माण करण्यात विरोधी पक्षाचे योगदान आहे असे स्पष्ट दिसत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

विरोधकांना स्वतःला ज्या लढाया लढता येत नाहीत तेथे असे ‘गुणरत्न’ ताब्यात घेऊन त्यांच्या डोक्यात झिंग भरून महाविकास आघाडीच्या विरोधात उभे केले जाते. भाजपने त्यांच्या नव्या गुणरत्नाचे योग्य प्रकारे पालनपोषण केले व भाजपमधील नवहिंदुत्ववादी पुढारी ठाकरे-पवारांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाविषयी ज्या चिथावणीखोर भाषेचा वापर करतात, त्याच मार्गाचा अवलंब गुणरत्नाने केला. शरद पवार यांच्याबाबतीत भाजपने दत्तक घेतलेल्या नवरत्नांनी जी भाषा वापरली, तोच कित्ता गुणरत्नाने गिरवला. गुणरत्नाने एस.टी. कर्मचाऱ्यांसमोर अनेकदा चिथावणीची भाषणे केली व पवारांच्या घरात घुसून जाब विचारण्याचे आव्हान दिले. कामगारांचे प्रश्न सुटावेत असे सरकारला वाटत होते, पण भाजप व त्यांच्या गुणरत्नांना तसे वाटत नसावे. वातावरण अधिकाधिक चिघळावे यासाठीच प्रयत्न केले गेले, असा आरोप शिवसेनेने केला आहे. ​​​​​

भाजपचे फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्या काळात एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण का झाले नाही, हा विचार हिंसा करणाऱयांच्या डोक्यात का आला नाही? गेल्या चारेक महिन्यांपासून ज्या पद्धतीची चिथावणीखोर आणि माथेफिरू पद्धतीची भाषणे हे गुणरत्ने करीत होते, तेव्हाच मुंबईतील कायद्याच्या रक्षकांनी सावध व्हायला हवे होते. शहरी नक्षलवाद समजून घ्यायचा असेल तर गुणरत्नाच्या वर्तनाकडे व भाषेकडे डोळसपणे पाहायला हवे. भीमा-कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेले अनेक लेखक, विचारवंत, कवी यांच्यावर शहरी नक्षलवादी असल्याचा ठपका आहे. त्यांना फडणवीस व मोदींचे राज्य उलथवून टाकायचे होते, त्यांच्यापासून फडणवीस-मोदींच्या जीवितासही धोका होता असे आक्षेप आणि आरोप भाजपची मंडळी सातत्याने करीत आली आहेत. सध्याच्या गुणरत्नाच्या कारवायाही त्याच शहरी नक्षलवादी चौकटीतच सुरू आहेत व त्याला खतपाणी घालण्याचे काम महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

कंपनीसोबत ऑनलाईन ट्रेडींग सुरु करण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याची 'इतक्या' लाखांत फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांनी दिवसभरात तीन ठिकाणी घेतला किर्तन श्रवणाचा लाभ !

September 30, 2023

राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे धरणगाव तहसीलला निवेदन

January 20, 2025

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार ११ ऑगस्ट २०२२ !

August 11, 2022

धरणगाव येथील महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ.मिलिंद डहाळे यांची निवड !

June 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group