TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मेहरून परिसरात भरधाव कारच्या धडकेत महिला ठार, 4 जण जखमी: जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांच्या आक्रोश

vijay waghmare by vijay waghmare
July 18, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या ५ महिलांसह २ चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १८ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यात चार महिला जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे यात एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्यासही दुखापत झाली असून सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान जमावाने कार चालकाला चांगलाच चोप दिला असल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते .

शोभा रमेश पाटील (वय ६० रा. साईप्रसाद कॉलनी, मंगलपूरी, मेहरुन) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात दिव्यांग पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. जळगावातील मेहरुण परिसरात अत्यंत अरुंद रस्ता असलेल्या मंगलपुरी भागात आज गुरुवारी १८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता निकाल काही महिला गप्पा मारीत आपल्या घरासमोर उभ्या होत्या. तर एक महिला रस्त्यावरुन जात होती. त्याचवेळी सायंकाळी साडेसहा वाजता रामेश्वर कॉलनीकडून एक भरधाव कार (एम.एच.०५ ए.एस०५७४) रस्त्याने भरधाव आली.कारवर चालकाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने कारने घरासमोर उभ्या असलेल्या या महिलांना धडक देत उडविले. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात दुध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील यांना गंभीर दुखापत होवू त्यांचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

त्यांच्यासोबत असलेल्या संगीता प्रकाश महाजन (वय ४८), जयश्री जगदीश राऊत (वय ३०), सुमनबाई साहेबराव पाटील (वय ६५), अर्चना पाटील (वय ४०) या जखमी झाल्या. तर दोन लहान मुलं देखील जखमी झाल्याची माहिती मिळाली. एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्या बाळाला देखील मार लागला. या घटनेमुळे परिसरातील लोक जमा होवून त्यांनी तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलांपैकी एकीचे पती प्रकाश महाजन यांनी जखमींना अपघातग्रस्त कार मध्येच टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. तेथे तातडीने उपचार सुरु करण्यात आले.

दरम्यान, या अपघातातील कारचा चालक कार चालक पवन कैलास पाटील वय 25 रा. सप्तशृंगी कॉलनी रामेश्वर कॉलनी मेहरूण जळगाव हा नवशिक्या असल्याचे समोर आले आहे. अपघात झाल्यावर त्यास पकडून नागरिकांनी जागेवरच चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला घटनास्थळी आलेल्या एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. कारचा चालक रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या घटनेमुळे पाटील परिवारावर शोककळा पसरली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRod accident

Related Posts

जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १९ जुलै २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एनसीबीच्या समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत नाही ; गृहमंत्री वळसे-पाटलांचे स्पष्टीकरण

October 12, 2021

सौरभ चौधरी खून प्रकरण : अवघ्या १० हजारासाठी मित्रानेच चिरला गळा !

October 6, 2022

जळगाव : नफ्याचे अमिष दाखवित व्यापाऱ्याला ३४ हजारात गंडविले !

December 15, 2024

पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक !

January 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group