जळगाव (प्रतिनिधी) येथील अंजुमन ए खिदमत ए खल्क संचलित डॉ. शाहीन काझी गर्ल्स ज्युनियर कॉलेजचा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. आसीया फय्याज शेखने ८८.३३ टक्के मिळवून प्रथम तर अलफिया मुसतकीम बागबानने ८४.५० टक्के मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
रोजमीन मो. आरिफ पिंजारीने ८४.३९ टक्के गुण मिळवून तृतीय स्थान प्राप्त केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्था अध्यक्ष अल्हाज डॉ.अमानूल्लाह शाह, तरबेज शेख तसेच संस्थेचे पदाधिकारी सदस्य मंडळी व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.