धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल चा इयत्ता दहावीचा १००% निकाल लागला. शाळेच्या एकूण २६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली त्यात ११ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण, १३ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण तर उर्वरित २ विद्यार्थ्यांना ७६ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काही विद्यार्थांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केले. त्यांच्या यशात आई – वडील, शिक्षक आणि अभ्यासाचे सुयोग्य नियोजन या बाबींचे योगदान असल्याचे मत या विद्यार्थांनी व्यक्त केले. दहावीच्या परीक्षेत सानिया पाटील – ९३.८०%, भाग्यश्री पाटील – ९३.२०%, निलय केदार – ९३.००%, भुवन बयस – ९२.२०, अमनकुमार वर्मा – ९२.००%, मोहिनी पांडे – ९१.८०, भूमिका सोनवणे – ९१.२०, रोशनी सावंत – ९१.००%, मानस अग्निहोत्री – ९०.६०, प्रीती पाटील – ९०.२०, यश पाटील – ९०.००%, गौरव माळी – ८८.६०, वंश सोनवणे – ८८.००%, सय्यम ओस्तवाल – ८८.००%, हितेश चौधरी – ८७.६०, रिध्दी गुजर – ८६.८०%, अभिजित पाटील – ८६.२०%, प्रथमेश पाटील – ८५.६०, साहिल खान – ८३.८०%, तेजस बोरसे – ८३.८०%, शाहिद खाटीक – ८३.६०%, आशिष तिवारी – ८३.६०%, मिलिंद बाविस्कर – ८३.४०%, यश शुक्ला – ८१.४०, चव्हाण गौरव – ७६.८०, मोमीन रेहान – ७६.६०% याप्रमाणे गुण मिळालेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख, भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, हर्षाली पुरभे, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, शिरीन खाटीक, नाजूका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवर्ग तसेच सरला पाटील, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख हे शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थिनी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी केले.