TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम

सलग तिसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल ; मुलींचे नेत्रदीपक यश

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता 10 वी चा सलग तिसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल लागला. यात विद्यार्थीनीनी नेत्रदीपक यश मिळवले आहे .

अनुभूती शाळेत यंदा 10 वी साठी एकूण 51 विद्यार्थी होते, त्यातील 50 विद्यार्थी विशेष प्रावीण्य सह गुणवत्ता यादीत आले आहे तर एक विद्यार्थी प्रथम वर्गात ( फर्स्ट क्लास ) आला आहे, या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पाहिली असता 90% च्यावर गुण मिळविणारे 15, 81 ते 90 टक्के गुण मिळविणारे 34, 74 ते 80 टक्के गुण मिळविणारे 2 विद्यार्थी आहेत. सर्वच वि्दयार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

पुर्वा रविंद्रसिंग राजपूत -प्रथम (95.60 %), वैष्णवी भास्कर पवार, निकिता गौतम सोनवणे – द्वितीय (94.00 %), दिव्या विलास बारी- तृतीय (93.20 %), राज चंद्रकांत सोनवणे- चतुर्थ (92.60), प्रथमेश शाम वाघ, कु.तेजल दिपक चौधरी- पाचवे (92.20) ठरली. गुणवत्ताधारक उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन तसेच जैन इरिगेशनचे सह-व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले.

इंग्रजी, मराठी, हिंदी, शास्त्र, गणित व सामाजिक शास्त्र या विषयात तर बहुतांश विद्यार्थ्यांनी 100 पैकी 95 च्यावर गुण पटकावले आहेत. शास्त्र विषयात राज सोनवणे व पुर्वा राजपूत 98 गुण, गणित विषयात वैष्णवी पवार 95 गुण, मराठी विषयात दिशा सपकाळे 94 गुण, हिंदीमध्ये पुर्वा 93 गुण तर इंग्रजी विषयात कु. क्रिष्णा भानुदास चव्हाण 93 गुण मिळविले आहेत.

कोविड नंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष परिक्षा व घरची हलाखीची परिस्थिती अशा आव्हानात्मकस्थितीत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश खूप दैदिप्यमान आहे, त्यांच्या या यशात अनुभूती स्कूलमधील शिक्षक आणि शिक्षकेतर वृंदाचा मोलाचा सहभाग आहेच, सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल हे त्याचे फलित आहे, अशी प्रतिक्रिया भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली.

शाळेत प्रथम आलेली पुर्वा राजपूत हिचे वडिल खासगी कंपनीत आहेत. दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली वैष्णवीचे वडिल कारपेंटर तर निकिताचे वडिल पेंटर आणि आई धुणीभांडी काम करतात. तृतीय आलेल्या दिव्या बारीची आई साफसफाई करतात. चतुर्थ आलेल्या राज सोनवणेचे वडिल शेतकरी आहेत तर पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला प्रथमेशचे वडील लॉड्री तर आई धुणीभांडी करतात. त्याच्यासोबत उत्तीर्ण झालेली कु. तेजल चौधरीची आई खासगी शिकवणी घेतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मिळवलेल्या या यशामुळे सर्वांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला.

समाजसेवा हा संस्कार आदरणीय भवरलालजी जैन यांच्या विचारांमधून घेतल्याचे सांगत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील दिशा निश्चित करताना डॉक्टर, आयपीएस, आयएएस, आयटी इंजिनीअर तर इंडियन नेव्हीमध्ये देशसेवा करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

दर महिन्याला चांगला परतावा हवाय ? ; पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरी बसून पाढे म्हणा व व्हाट्सअप वर टाका ; अमळनेर येथील गणिताच्या शिक्षकाचा ऑनलाइन प्रयोग

April 5, 2021

नवीन रास्ता बांधकाम करण्याची युवा संघर्ष समितीची मागणी

October 7, 2020

भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा !

July 12, 2022

भाऊंना भावांजली’ महोत्सवांतर्गत ‘लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

December 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group