धरणगाव (प्रतिनिधी) प्रशासनातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार धरणगाव तालुक्यात आज १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे यातील ३ रुग्ण एकट्या धरणगाव शहरात आढळून आले आहेत. तर दुसरीकडे एकुण बाधितांचा आकडा ३८६४ इतका झाला आहे.
धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात १३ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. त्यात धरणगाव शहर : ३,
भवरखेडा : २, बोरगांव : २, निमखेडा : १, पष्टाणे : १, सोनवद : २, साळवा : १, हिंगोणे : १, तर धरणगाव शहरात तब्बल ३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात ३८७७ रूग्ण झाले असून यापैकी ५५ रूग्ण मयत झाले. तर ३४९६ रूग्ण बरे झाले असून उर्वरित ३२६ रूग्ण हे उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.