जळगाव (प्रतिनिधी) जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांत सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघातून ६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी ५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता जळगाव लोकसभा मतदार संघात एका जागेसाठी १४उमेदवार त रावेर लोकसभा मतदार संघात २४उमेदवार रिंगणात आहेत. माघारी नंतर आता निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात रिंगणातील अंतिम १४ उमेदवार !
करण बाळासाहेब पाटील- पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), विलास शंकर तायडे (बहुजन समाज पार्टी), स्मिता उदय वाघ, (भारतीय जनता पार्टी), माजी हवलदार-ईश्वर दयाराम मोरे (सैनिक समाज पार्टी), नामदेव पांडुरंग कोळी (अपक्ष), युवराज भीमराव जाधव (वंचित बहुजन आघाडी), अब्दुल शकूर देशपांडे (अपक्ष), अहमद खान युसुफ खान (अपक्ष), करण पवार (अपक्ष), संदीप युवराज पाटील (अपक्ष), महेंद्र देवराम कोळी (अपक्ष), मुकेश मूलचंद कोळी (अपक्ष), ललित गौरीशंकर शर्मा (अपक्ष), अड. बाबुराव तुकाराम दाणेज (अपक्ष). यात माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये लक्ष्मण गंगाराम पाटील (अपक्ष), प्रदीप शंकर आव्हाड (अपक्ष), डॉ. प्रमोद हेमराज पाटील (अपक्ष), रोहित दिलीप निकम (अपक्ष), संजय एकनाथ माळी (अपक्ष), संग्रामसिंग सुरेश सूर्यवंशी (पाटील) (अपक्ष) यांचा समावेश आहे.
रावेर मतदार संघ
रक्षा निखिल खडसे (भारतीय जनता पार्टी), विजय रामकृष्ण काळे (बहुजन समाज पार्टी), श्रीराम दयाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), अशोक बाबुराव जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक), गुलाब दयाराम भिल (भारती आदिवासी पार्टी), वसंत शंकर कोलते (बहुजन मुक्ती पार्टी), संजय पंडीत ब्राम्हणे (वंचित बहुजन अघाडी), संजयकुमार लक्ष्मण वानखेडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल), अनिल पितांबर वाघ (अपक्ष),अमित हरिभाऊ कोलते (अपक्ष), प्रा. डॉ. आशिष सुभाष जाधव (अपक्ष), एकनाथ नागो साळुंके (अपक्ष), कोमलबाई बापुराव पाटील (अपक्ष), जितेंद्र पांडुरंग पाटील (अपक्ष), प्रविण लक्ष्मण पाटील (अपक्ष), भिवराज रामदास रायसिंगे (अपक्ष), ममता उर्फ मुमताज भिकारी तडवी (अपक्ष), युवराज देवसिंग बारेला (अपक्ष), डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते (अपक्ष), श्रीराम ओंकार पाटील (अपक्ष), श्रीराम सिताराम पाटील (अपक्ष), शेख आबिद शेख बशीर (अपक्ष), सागर प्रभाकर पाटील (अपक्ष), संजय प्रल्हाद कांडेलकर (अपक्ष). तर नाजमीन शेख रजमान (सर्व समाज जनता पार्टी), रऊफ युसुफ शेख (अपक्ष), नितीन प्रल्हाद कांडेलकर (अपक्ष), राहुलरॉय अशोक मुळे (अपक्ष), शेख कुर्बान शेख करिम (अपक्ष) यांनी माघार घेतली आहे.