TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात ऑक्सीजन अभावी १४ रुग्णांचे प्राण धोक्यात ; डॉ. नी. तू. पाटीलांनी स्वखर्चातून केला पुरवठा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2021
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील ग्रामिण रुग्णालय व ट्रामा कोविड डीसीसीएचमध्ये १४ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. मात्र बुधवारी ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता. पुरवठादारालाच एजन्सीकडून ऑक्सीजन मिळत नसल्याने स्थिती बिकट झाली होती, अशा बिकट स्थिती भाजपचे डॉ. नी. तू. पाटील यांनी स्वखर्चातून १० सिलेंडरचा पुरवठा करुन दिला. यामुळे गुरुवारी सकाळपर्यंत हा साठा टिकला.

भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना रुग्णालयात मागील एक वर्षापासून ऑक्सीजन पुरवठादाराचे सव्वादोन लाख रुपये थकीत आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाने ठेकेदाराला एक दमडी देखील दिली नाही. पुरवठादारांवरही एजन्सीचे देणे वाढल्याने तसेच तीव्र टंचाई असल्याने डिस्टीब्युटरने बुधवारी ऑक्सीजन पुरवठा बंद केला. यामुळे ग्रामिण रुग्णालयातही सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत. बुधवारी सकाळी केवळ पाच सिलेंडर उपलब्ध होते. यामुळे केवळ सायंकाळपर्यंत रुग्णांना ऑक्सीजन देता येणार होता. यामुळे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी चिंतेत होते. भाजप वैद्यकिय आघाडीचे सहसंयोजक तथा भुसावळ ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नी. तू. पाटील यांना हा विषय समजल्यानंतर त्यांनी हिंदूस्तान एजन्सीतून सात हजार रुपयांचे तुर्त दहा सिलेंडर खरेदी करुन ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. हा ऑक्सीजनचा साठा गुरुवारी सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत टिकू शकेल. यानंतर मात्र पून्हा सिलेंडरची गरज भासणार आहे. जिल्हा प्रशासकिय यंत्रणा, जिल्हा आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधी ही सर्व बिकट परिस्थिती पाहूनही ठोस निर्णय घेत नसल्याने १४ रुग्णांचा जिव टांगणीला आहे. ऑक्सीजनचा पुरवठा हेात नसेल तर उपचार होतील कसे? असा प्रश्नही निर्माण होत आहे.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

५० वाढीव बेडचे नियोजन फोल

ट्रामा सेंटरमध्ये ऑक्सीजनयुक्त सुविधेचे ५० बेडचे नियोजन आहे. यासाठी १५ क्युबीक मिटरचा ऑक्सीजन जनरेशन प्लॉटला आमदार संजय सावकारे यांनी ३० लाखांचा निधी दिला आहे. मात्र सप्टेंबरपासूनचे हे नियोजन सात महिने उलटूनही पूर्ण झाले नाही. दुसरीकडे मात्र ऑक्सीजन अभावी रुग्ण मरणाच्या दारात आहेत.

रस्त्यावर उतरावे लागेल

बुधवारचा दिवस व रात्र ऑक्सीजन सिलेंडरमुळे लोटली गेली, मात्र गुरुवारी पून्हा पुरवठा लागणार आहे. यामुळे समाजातील दानशुरांनी मदत करुन किमान ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुन रुग्णांचा जिव वाचवावा. जिल्हा व आरोग्य प्रशासन सुस्तावले असून आता रस्त्यावर उतरावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. असे डॉ. नि. तू. पाटील म्हणाले.

एकीकडे १४ रुग्णांनाच्या जीवाची भीती अन दुसरीकडे गेंड्याच्या कातडीचे आरोग्य प्रशासन

संध्याकाळ पर्यंतच ऑक्सिजन सिलेंडर वर १४ रुग्ण तग धरून राहतील आणि रात्री मात्र सर्वांच्या जीवाला धोका आहे, कारण ऑक्सिजन संपेल आणि पुरवठा पण ठप्प आहे. अशी माहिती जेव्हा डॉ. नि. तू. पाटील यांना दुपारी दि. १४ एप्रिल २०२१ ला कळली, तेव्हा त्यांनी लगेच जिल्ह्याधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सूर्यवंशी, जे जिल्हा ऑक्सिजन सेवा सध्या नियंत्रित करत आहे, त्यांना व्हाट्सअप्प करून कल्पना दिली, पण संध्याकाळपर्यंत कोणीही प्रतिसाद दिला नाही.

शेवटी डॉ. नि. तू. पाटील यांनी माझ्या ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठित, भुसावळतर्फे १४ रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी स्वखर्चाने १० ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी ते स्वतः भुसावळ MIDC मध्ये गेलेत, पण तिथेही तुटवडा असल्याने फक्त ५ ऑक्सिजन सिलेंडर भरून मिळाले आणि आज सकाळी १० वाज्यापर्यंत ५ भरून मिळतील.

“जिल्हा आरोग्य प्रशासन गेंड्याच्या कातडीचे….”

मागील २ दिवसापासून जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे ऑक्सिजन कमतरता आणि ठेकेदार थकबाकी याबद्दल पाठपुरावा करत आहे, पण जिल्हा आरोग्य प्रशासन गेंड्याच्या कातडीचे आहे. आज बाह्य ऑक्सिजन १४ रुग्णांना मिळाला नसता तर विपरीत परिस्थिती आली असती, म्हणून आज स्वखर्चाने १० ऑक्सिजन सिलेंडर भरून रुग्णांच्या जीव वाचवला, आता उद्या परत हीच परिस्थिती निर्माण होईल. भुसावळ मधील दानशूर व्यक्ती /सामाजिक संस्था यांनी पुढे यावे, असे आवाहन डॉ. नि. तू. पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

'हरिद्वारचा कुंभमेळावा म्हणजे कोरोनाचा अणुबॉम्बच' : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपतर्फे नितीन गडकरी यांच्यासाठी “परिवार संवाद” कार्यक्रमाचे आयोजन

April 22, 2022

मोठी बातमी : धुळ्याजवळ सिनेस्टाईल थरार ; धरणगावच्या व्यापाऱ्याचे ११ लाख रुपये लुटले !

July 18, 2024

लग्नाला दिडच महिने झाले अन् पतीला व्हिडीओ कॉल करून नववधूनं कापली हाताची नस ; पतीनंही घेतला गळफास

January 16, 2022

BMC विरोधात सोनू सूदची हायकोर्टात धाव; अनधिकृत बांधकाम न केल्याचा दावा

January 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group